पुणे : आधार अद्ययावत करण्यास मुदतवाढ | पुढारी

पुणे : आधार अद्ययावत करण्यास मुदतवाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आधार अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने पंधरवडा मोहीम सुरू केली होती. त्यात 45 हजार नागरिकांनी आधार अद्ययावत केले. जिल्हा प्रशासनाने या मोहिमेला 30 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे आदेश केंद्रचालकांना देण्यात आले आहेत, तर सार्वजनिक आणि साप्ताहिक शासकीय सुट्यांच्या दिवशी देखील आधार केंद्र सुरू ठेवले जात आहे. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 1 कोटी 32 लाख नागरिकांकडे आधार आहे. 30 लाख नागरिकांचे जुने आधार कार्ड अद्ययावतीकरण शिल्लक होते.

 

Back to top button