पुणे : दोन नळ पडले तब्बल 39 हजारांना | पुढारी

पुणे : दोन नळ पडले तब्बल 39 हजारांना

पुणे : ग्राहकाने बाथरूमसाठी दोन नळ ऑनलाइन मागविले. मात्र, ते वेळेवर आले नाहीत. त्यामुळे ऑनलाइन मोबाईल नंबर शोधून त्यावर कॉल केला. त्यानंतर कंपनीने ऑनलाइन लिंक पाठविली. ती ओपन करताच संबंधित ग्राहकाच्या खात्यातून 39 हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हेमंत गोपाळ करकरे (रा. लुल्लानगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 4 ते 5 मार्चदरम्यान घडला. करकरे यांनी आनंद लॉजिस्टिक यांनी फिर्यादीला तुमचे नळ प्रोफेशनल कुरिअरकडून पाठविण्यात आल्याचे सांगितले होते. याचदरम्यान फिर्यादी यांनी गुगलवर नंबर सर्च करून मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यानंतर त्यांना एक लिंक मिळाली. त्या आधारे त्यांच्या खात्यातील तब्बल 39 हजार रुपये काढून घेण्यात आले.

Back to top button