पुणे जिल्ह्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीत 54 टक्के मतदान

पुणे जिल्ह्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीत 54 टक्के मतदान

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात नव्याने स्थापित आणि मुदत संपणार्‍या 221 ग्रामपंचायतींचा निवडणूक जाहीर कार्यक्रम झाला होता. त्यातील सरपंच पदाच्या 167 तर सदस्यपदाच्या 1062 जागांसाठी मतदान  होत आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत 54 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील तेरा पैकी अकरा तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा निवडणुकीमध्ये समावेश आहे.  221 ग्रामपंचायतींपैकी 27 ग्रामपंचायत मधील सदस्य बिनविरोध निघाले. तसेच या निवडणुकीत सरपंचाची निवड थेट केली जात असून, 49 ग्रापंचायतीचे सरपंच बिनविरोध निघाले आहेत. तसेच पाच ग्रामपंचायतीमध्ये रिक्त आहे. त्यामुळे आता सरपंचपदाच्या 167 जागांसाठी मतदान होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने दिलेल्या माहितीनुसार सदस्य पदांच्या 1062 जागांसाठी मतदान होत असून, त्यासाठी 30 हजार 13 उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून,साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु असणार आहे. सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाच्या टक्केवारीने 54.08 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील तीन लाख 3 हजार 589 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील एक लाख 64 हजार 172 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news