दर वाढल्याने बजेट कमी करुन सोने खरेदी

File Photo
File Photo
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सोन्याचे दर गेल्या आठवडाभरात प्रति दहा ग्रॅममागे 700 ते 1 हजार रुपयांनी वाढले आहे. सोन्याचे दर वाढलेले असताना लग्नसराईमुळे बजट कमी करुन का होईना सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरु आहे. सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता सोने खरेदीवर विशेष परिणाम होणार नसल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 61 हजार 300 रुपये तर, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅममागे 57 हजार 200 रुपये इतका सुरु होता. प्रति किलो चांदीचा दर 76 हजार रुपये इतका होता. सध्या सोन्याच्या दरामध्ये प्रति दहा ग्रॅममागे 1 हजार रुपयांची वाढ गेल्या दहा दिवांत झाली आहे. तर, चांदीच्या दरात प्रति 1 किलोमागे 2 ते अडीच हजार रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे.
दरवाढ तरी मागणी कायम

24 कॅरेटचा सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅममागे जवळपास दोन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता सराफ व्यावसायिक व्यक्त करत आहेत. तर, चांदीमध्येही प्रति किलोमागे 1 ते दीड हजार रुपयांपर्यत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरवाढीचा हा अंदाज लक्षात घेता सध्याच्या दराने जेवढे शक्य होईल तेवढे सोन्याचे दागिने तसेच, गुंतवणूकीसाठी कॉईन, वेढणी यांची खरेदी केली जात आहे.

लग्नसराईमुळे मागणी टिकून
सध्या लग्नसराई सुरु असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी टिकून आहे. भाववाढ झाली असल्याने 5 तोळे दागिने घेणारा ग्राहक 4 ताळे का होईना खरेदी करत आहे. सोन्यामध्ये अ‍ॅन्टीक ज्वेलरीला पसंती मिळत आहे. हार, मंगळसूत्र, चोकर, बांगड्या यांना चांगली मागणी आहे. त्याचप्रमाणे, चांदीमध्ये पुजेचे साहित्य, देवाच्या मूर्ती, पैंजण, विविध गिफ्ट आयटम यांना चांगली मागणी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news