पिंपरी : एसटीची कॅशलेसबाबत संथगती | पुढारी

पिंपरी : एसटीची कॅशलेसबाबत संथगती

राहुल हातोले : 

पिंपरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना खिशात सुटे पैसे ठेवणे आवश्यक होते मात्र आता एसटीच्या विभागातील आगारांमध्ये कॅशलेस व्यवहार करता येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगार आणि निगडी येथे स्वॅप मशीन ठेवण्यात आल्या आहेत. या मशीनद्वारे प्रवाशांना कार्ड स्वॅप करून तिकीट काढता येते. यामुळे प्रवाशांची सोय होत असून, कर्मचार्‍यांनाही चिल्लर जवळ बाळगण्याचा त्रास दुर झाला आहे.

मात्र इतर थांब्यावरून चढणार्‍या प्रवाशांसाठी बसमध्ये ही सोय अद्यापपर्यंत मंहामंडळाने केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांसह वाहकांना सुटे पैसे देण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावरून एसटीचा कॅशलेस व्यवहार संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. यासोबतच राज्य परिवहन महामंडळाने एसटीचे आरक्षण आणि जागा बुक करण्यासाठी ऑनलाईनद्वारे सोय केली आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या अ‍ॅपद्वारे देखील एसटीच्या आरक्षणासह हवी ती जागा बुक करता येते. त्यामुळे एसटीचा व्यवहार हा आता कॅशलेसकडे वाटचाल करताना दिसून येत आहे.

 

Back to top button