पुणे : पेपरलेससाठी पहिले पाऊल; आयडब्ल्यूएमएस प्रणालीचा वापर

पुणे : पेपरलेससाठी पहिले पाऊल; आयडब्ल्यूएमएस प्रणालीचा वापर
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने पेपरलेससाठी महत्त्वाचे पाऊल टाकले असून, इंटेलिजेंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम (आयडब्ल्यूएमएस) या संगणक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. या प्रणालीत महापालिकेचे अंदाजपत्रक आणि शासकीय दरपत्रक (डीएसआर) अपलोड करण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकार्‍यांनी दिली. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ कार्यालय आणि मुख्य खात्यामार्फत शहरात विविध विकासकामे, प्रकल्प राबविले जातात. या कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाते.

मात्र, अनेकवेळा रस्ते, पदपथ, डांबरीकरण, सांडपाणी वाहिनी आदी कामे दुबार होतात. तसेच न केलेल्या कामाचीही बिले काढली जातात. या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने आयडब्ल्यूएमएस संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागातील गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाची माहिती संकलित केली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षातील काम आणि त्यासाठी असलेल्या तरतुदींचाही समावेश आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्व अभियंत्याना याचे प्रशिक्षण दिले आहे. संगणक प्रणालीच्या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रिया, निविदा प्रक्रिया, बिल देणे आदी कामे ऑनलाईनच होणार आहेत. संबंधितांची डिजीटल स्वाक्षरी नोंदविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रणालीमुळे विकासकामासंदर्भात सूचना देणे, पूर्वगणक पत्रक सादर करणे, कार्यादेश देणे, गुणवत्ता तपासणे, कामाची बिले सादर करणे, तपासणी करणे ते अंतिम बिल काढेपर्यंतची प्रक्रिया पेपरलेस होणार आहे. सध्या पेपर आणि पेपरलेस दोन्ही पध्दतीने कामकाज सुरू असून, पुढील सहा महिन्यांत पूर्णतः पेपरलेस कारभार केला जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

संगणक प्रणालीचे फायदे

बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, पथ, भवन, मैलपाणी आणि सांडपाणी आदी विभागांकडून कामांच्या प्रस्तावाची सद्यस्थिती कळणार आहे. ज्या ठिकाणी काम करायचे आहे तेथे जीआयएस मॅपने टॅग केले जाईल. त्यामुळे एका कामासाठी दुबार खर्च टळेल. संगणक प्रणालीत प्रकल्प सल्लगार, ठेकेदार यांनाही लॉगईन देता येणार आहे. यामध्ये फाईल गहाळ होणे, फाईल लपविणे आदी प्रकार होणार नाहीत. टेंडर प्रक्रियेसाठी लागणारा तीन महिन्यांचा कालावधी एक महिन्यावर येईल. संगणकासह मोबाईल अ‍ॅपद्वारेही ही प्रणाली वापरता येणार असल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news