पुणे : न्यूमोनिया लसीकरणाचे प्रमाण उणे ! | पुढारी

पुणे : न्यूमोनिया लसीकरणाचे प्रमाण उणे !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणा-या लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस (पीसीव्ही) राज्यात जुलै 2021 मध्ये आणण्यात आली. मात्र, लसीकरणामध्ये राज्य उणे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. केंद्र शासनाच्या अहवालानुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मृत्यूचे आणि आजाराचे न्यूमोनिया हे सर्वात मोठे कारण आहे. न्यूमोनियाविरुद्ध लसीकरण उपलब्ध असूनही देशातील बहुतांश मुले त्यापासून वंचित आहेत. नवीन विषाणू आणि श्वासोच्छवासात अडथळा निर्माण करण्याच्या विषाणूंचे उपप्रकार प्रबळ होत असल्याने न्यूमोनिया लहान मुलांमध्ये चिंतेची बाब ठरत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये, एकूण उद्दिष्टापैकी फक्त 50 टक्के बालकांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले, फक्त 38% लाभार्थ्यांना दुसरा डोस आणि 6 टक्के लाभार्थ्यांना बुस्टर डोस मिळाला. पुढील वर्षी, 2022-23 मध्ये, पहिल्या डोससाठी 88%, दुसर्‍या डोससाठी 87% आणि बूस्टर शॉटसाठी 76% लसीकरण झाले.

लसीकरणाचे टप्पे
पीसीव्ही 1 : 1.5 महिने किंवा सहा आठवडे
पीसीव्ही 2 : 3.5 महिने किंवा 14 आठवडे
पीसीव्ही बुस्टर : 9वा महिना

राज्यातील लसीकरणाची स्थिती
कालावधी उद्दिष्ट उद्दिष्टपूर्ती टक्केवारी
2021-22 1912580 956885 50
2022-23 1927160 1703079 88
कालावधी उद्दिष्ट उद्दिष्टपूर्ती टक्केवारी
2021-22 1912580 722888 38
2022-23 1927160 1681725 87
कालावधी उद्दिष्ट उद्दिष्टपूर्ती टक्केवारी
2021-22 1912580 110547 6
2022-23 1927160 1472689 76

पीसीव्ही 1, पीसीव्ही 2 आणि पीसीव्ही बुस्टर जुलै 2021 पासून महाराष्ट्रात आणण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून प्रतिसाद वाढत आहे परंतु, अधिकाधिक पालकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, अशी आमची इच्छा आहे.

                             डॉ सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी

Back to top button