चाकण : हिरवी मिरची, बटाटा, वाटाण्याची मोठी आवक | पुढारी

चाकण : हिरवी मिरची, बटाटा, वाटाण्याची मोठी आवक

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांसह हिरवी मिरची, बटाटा व वाटाण्याची मोठी आवक झाली. कांद्याची आवक घटून भाव तेजीत राहिले. कांदा व लसणाची आवक निम्म्याने घटली. साता-याहून आले, मुरबाडहून भेंडी व गुजरातहून तोतापुरी कैर्‍यांची विक्रमी आवक झाली. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत भरपूर वाढ झाली. एकूण उलाढाल 3 कोटी 70 लाख रुपये झाली.

बाजारात कांद्याची एकूण आवक 5 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक निम्म्याने घटल्याने कांद्याच्या भावात 300 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 700 रुपयांवरून 1,000 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 1,250 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने वाढून भावात 300 रुपयांची वाढ झाली.

बटाट्याचा कमाल भाव 1,700 रुपयांवरून 2,000 रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक निम्म्याने घटूनही कमाल भाव 7 हजार रुपयांवर स्थिरावला.हिरव्या मिरचीची एकूण आवक 405 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 10 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 2 हजार रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे-कांदा – एकूण आवक – 5,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,000 रुपये, भाव क्रमांक 2. 800 रुपये, भाव क्रमांक 3. 600 रुपये.बटाटा – एकूण आवक – 1,250 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,650 रुपये, भाव क्रमांक 3. 1,300 रुपये.

फळभाज्या – एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे – टोमॅटो – 230 क्विंटल (600 ते 1,000 रुपये), कोबी – 235 क्विंटल (500 ते 800), फ्लॉवर – 225 क्विंटल ( 800 ते 1,200), वांगी – 92 क्विंटल (1,500 ते 2,500), भेंडी – 135 क्विंटल (2,000 ते 4,000), दोडका – 63 क्विंटल (3,000 ते 4,000), कारली – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा – 62 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी – 74 क्विंटल (2,000 ते 3,000), फरशी – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड – 63 क्विंटल (1,500 ते 2,500), गवार – 14 क्विंटल (7,000 ते 9,000), ढोबळी मिरची – 136 क्विंटल (2,000 ते 3,000), चवळी – 24 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा – 60 क्विंटल (6,000 ते 7,000), शेवगा – 55 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर – 108 क्विंटल (1,000 ते 1,500).पालेभाज्या – पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण 39 हजार 950 जुड्या (500 ते 1,000 रुपये), कोथिंबीर – एकूण 28 हजार 580 जुड्या (500 ते 900 रुपये), शेपू – एकूण 4 हजार 850 जुड्या (600 ते 1,000 रुपये ), पालक – एकूण 3 हजार 870 जुड्या (600 ते 800 रुपये).

जनावरे-चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 40 जर्शी गाईंपैकी 25 गाईंची विक्री झाली.(10,000 ते 70,000 रुपये), 105 बैलांपैकी 70 बैलांची विक्री झाली (10,000 ते 45,000 रुपये). विक्रीसाठी आलेल्या 95 म्हशींपैकी 75 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 30 हजार ते 80 हजार रुपये भाव मिळाला. विक्रीसाठी आलेल्या 10,640 शेळ्यांपैकी 10,265 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Back to top button