पुणे : मुलांनो, उन्हाळी सुट्टीत करा सायन्स पार्कची सफर | पुढारी

पुणे : मुलांनो, उन्हाळी सुट्टीत करा सायन्स पार्कची सफर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोणाला बागकामाची आवड असते तर कोणाला ग्रह- तार्‍यांचे कुतूहल असते, कोणाला गणित आवडते तर कोणी विज्ञानातील प्रयोग करण्यास इच्छुक असते. अशा सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांची आवड आणि शिक्षण याची सांगड घालत नवे प्रयोग करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकेशन’ म्हणजेच सायन्स पार्कतर्फे 2 मे ते 24 मे दरम्यान समर कॅम्प- 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

बच्चे कंपनीची शाळेची सुटी सुरू झाली आहे. ही सुटी मजेत तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात घालवण्यासाठी उत्तम पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला आहे. दुसरीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वयोगटासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सायन्स पार्कचे समन्वयक डॉ. रा. ल. देवपूरकर यांनी दिली. 2 ते 24 मे या कालावधीत एक दिवसीय कॅम्प होत आहे तर दोन दिवसीय कॅम्प 8 ते 23 मे या कालावधीत होणार आहे.

यासाठीची सर्व माहिती, कॅम्पच्या तारखा तसेच यासाठीचे शुल्क विद्यापीठाच्या ीलळशपलशरिीज्ञर्.ीपर्ळिीपश. रल. ळप या संकेस्थळावर उपलब्ध आहे. या कॅम्पमध्ये विद्यापीठ परिसरात निसर्ग भ्रमंती, विज्ञान खेळ, रसायनशास्त्र, बागकाम, खगोलशास्त्र, गणित आणि जैवशास्त्र, विज्ञान खेळणी, तज्ज्ञांशी चर्चा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. यासाठी नावनोंदणी आवश्यक असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

Back to top button