पुणे : अंतिम वर्ष परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे; विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वर्ष ऑगस्टमध्ये | पुढारी

पुणे : अंतिम वर्ष परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे; विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वर्ष ऑगस्टमध्ये

पुणे : राज्यात संपलेला ऊसगाळप हंगाम 2022-23 मध्ये परवानगी न घेता 22 साखर कारखान्यांनी विनापरवाना ऊसगाळप केल्याप्रकरणी साखर आयुक्तालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित साखर कारखान्यांनी 35 लाख टन ऊसगाळप केले असून, त्यावर प्रतिटन पाचशे रुपयांप्रमाणे 176 कोटींच्या दंडात्मक कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. पुण्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना, निरा भीमा कारखाना तसेच राजगड साखर कारखान्यांचा यात समावेश आहे.

साखर आयुक्तालयाने गाळप परवाना मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करून गाळप परवाना प्राप्त करून घेण्याबाबत कारखान्यांना कळविले होते. तसेच साखर कारखान्यास गाळप परवाना देताना शेतकर्‍यांच्या उसाची संपूर्ण एफआरपीचे रक्कम देणे अनिवार्य आहे. याशिवाय अन्य काही रक्क्कम थकीत असताना विनापरवाना गाळप केल्याने साखर आयुक्क्तालयाने ही कारवाई केली आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील उन्हाळी सत्रात पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन आहे. अभ्यासक्रमानुसार त्या-त्या विषयांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www. unipune. ac. in या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे नियोजन हे महाविद्यालय स्तरावर तर अन्य नियोजन हे विद्यापीठ स्तरावर केले जाणार असल्याचे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज वेळेत भरावेत, असेही आवाहन विद्यापीठ परीक्षा मंडळाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 2 ते 30 मे या कालावधीत होतील, तर जून महिन्यापासून लेखी परीक्षेला सुरुवात होईल.

नवीन शैक्षणिक वर्ष ऑगस्टमध्ये सुरू करण्याचे नियोजन असून, चालू शैक्षणिक वर्षाच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी नियोजित कालावधीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून परीक्षा वेळेत पार पडण्यास मदत होईल.

                     – डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Back to top button