पुणे : ऑनलाइन भाडेकरार दस्त नोंदविण्यात पुन्हा अडचणी | पुढारी

पुणे : ऑनलाइन भाडेकरार दस्त नोंदविण्यात पुन्हा अडचणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा ऑनलाइन भाडेकरार दस्त नोंदविण्यात समस्या निर्माण झाल्या आहेत. मागील महिन्यातही अशाच अडचणी आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता.
राज्यातील ग्रामीण भागातून तसेच परराज्यांमधून मोठ्या शहरांमध्ये नोकरी, शिक्षणानिमित्त येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे.

या नागरिकांना रहिवास पुरावा, दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी, गॅस नोंदणी, पारपत्र, विवाह नोंदणी अशा विविध कारणांसाठी ऑनलाइन भाडेकरार ग्राह्य धरण्यात येतो. आरटीई प्रवेशासाठी अर्ज करायचा असल्यास अर्ज भरण्यापूर्वीचा किंवा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी भाडेकरार नोंदणीकृत असणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ऑनलाइन भाडेकराराला कायदेशीर मान्यता असल्याने असा भाडेकरार करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

दरम्यान, राज्यात दररोज सुमारे अडीच ते तीन हजार भाडेकरारांची नोंदणी होते. गेल्या महिन्यात नोंदणी विभागाच्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांची नोंदणी प्रलंबित होती. राज्यभरात सुमारे 36 हजारांहून अधिक भाडेकरार दस्तनोंदणीसाठी प्रलंबित होते. मध्यंतरी तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे काही प्रमाणात प्रलंबित दस्तांची नोंदणी टप्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली.

मात्र, पुन्हा सर्व्हरमध्ये अडचणी येऊ लागल्याने हे काम खोळंबले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे भाडेकराराचे दस्त प्रलंबित राहत आहेत. राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ही अडचण दूर करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पुन्हा सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिका-यांनी

Back to top button