पुणे : सोसायट्यांमध्येही आता स्थापन होताहेत हास्यक्लब | पुढारी

पुणे : सोसायट्यांमध्येही आता स्थापन होताहेत हास्यक्लब

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आतापर्यंत आपण फक्त उद्यानांमध्येच हास्य क्लबमार्फत उपक्रम राबवल्याचे ऐकले होते…. पण, आता सोसायट्यांमध्येही हास्य क्लबची स्थापना केली जाणार असून, हास्ययोगाचा प्रसार आणि प्रसार व्हावा, यासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवाराने हास्य क्लब संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे पुण्यातील 250 सोसायट्यांमध्ये हास्य क्लब स्थापनेचे काम होत असून, या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे.

बाणेर, बावधन, पाषाण आदी ठिकाणच्या सोसायट्यांमध्ये हास्य क्लब स्थापनेची सुरुवात झाली आहे. वर्षभरात टप्प्याटप्प्याने इतर सोसायट्यांमध्ये हास्य क्लब स्थापन करण्यात येणार असून, सुमारे एक लाख लोकांना हास्ययोगाच्या चळवळीशी जोडण्यासाठी परिवाराकडून विविध उपक्रमही राबविले जात आहेत. रविवारी (दि. 7) जागतिक हास्य दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने दै. ‘पुढारी’ने या अभियानाविषयी जाणून घेतले.

नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या माध्यमातून विठ्ठल काटे आणि सुमन काटे, मकरंद टिल्लू हे गेली पंचवीस वर्षे हास्ययोग प्रसार व प्रचाराचे कार्य करत आहेत. हसण्याचे शारीरिक व मानसिक महत्त्व लोकांपर्यंत पोचावे आणि त्यांना आपल्या घराजवळच हास्य क्लबची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी सोसायट्यांमध्ये हास्य क्लब स्थापनेची संकल्पना पुढे आली आहे. परिवाराचे मुख्य समन्वयक असलेले टिल्लू म्हणाले, ’नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या 218 हास्य क्लब शाखांमधून 25000 हून अधिक सदस्यांनी या विनामूल्य आरोग्य चळवळीचा लाभ घेतला आहे.

काय होतात फायदे ?

  • फुस्फुसांची क्षमता वाढते.
  • शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढते.
  • हृदयाची कार्यक्षमता वाढते.
  • हसताना पचनसंस्थेसह स्थायूसंस्था योग्यरीत्या कार्यान्वित राहते. तणावमुक्ती राहते.
  • सकारात्मक मानसिकता आणि आनंदी आयुष्याला नवी ऊर्जा मिळते.

सर्वच जर ठेकेदारांवर सोपवले जाणार असेल, तर अधिकारी, आयुक्तही ठेकेदारीनेच नेमावेत. पाण्यासारख्या अत्यावश्यक कामांची देखभाल-दुरुस्ती आणि वाटपाचे नियोजन महापालिकेकडे असणे आवश्यक आहे.

                          – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक

Back to top button