मध्य महाराष्ट्रासह कोकणात आठवडाभर पावसाचा अंदाज | पुढारी

मध्य महाराष्ट्रासह कोकणात आठवडाभर पावसाचा अंदाज

पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात तुरळक ठिकाणी अजून आठवडाभर विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील काही भागातही पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे अंदमान-निकोबार, केरळसह तमिळनाडू भागात 12 मेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्याच्या बहुतांश भागात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. दरम्यान पावसाचा जोर थोडासा कमी झाला असलातरी पूर्णपणे थांबलेला नाही. सध्या बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात चक्रीय स्थिती आहे. या स्थितीचे 8 मे रोजी कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार आहे. या स्थितीमुळेच राज्यात अजूनही अवकाळी पाऊस पडत आहे.

Back to top button