मिरचीने आणले डोळ्यात पाणी ; 100 ते 120 रुपयाने मिरचीच्या भावात वाढ | पुढारी

मिरचीने आणले डोळ्यात पाणी ; 100 ते 120 रुपयाने मिरचीच्या भावात वाढ

कामशेत : लालमिरचीच्या वाढलेल्या भावामुळे महिलांच्या डोळ्यात आले पाणी मावळ तालुक्यात कामशेत बाजारपेठेत लालमिरची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असते. मे महिना हा महिलांचा हळद मसाले बनवण्याचा काळ असतो या काळात महिलांना मोठ्या प्रमाणात लालमिरची खरेदी करावी लागते. यावर्षी मिरचीच्या भावात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे लाल तिखट मसाला करायचा नाही का, असा प्रश्न महिला वर्गांमध्ये निर्माण झाला आहे.

गेल्यावर्षी लाल मिरची दीडशे रुपये किलो होती यावर्षी 270 रूपये बाजारात विक्रीस उपलब्ध झाली आहे जवळपास 100 ते 120 रुपयाने मिरचीच्या भावात वाढ झाली आहे ही वाढ झाली कारण यावर्षी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे मागणी जास्त व आवक कमी यामुळे मिरचीचे दर वाढले. यासंदर्भात मिरचीचे व्यापारी सचिन रायसोनी यांनी सांगितले की यावर्षी मोठ्या प्रमाणात पडणारा अवकाळी पाऊस व त्या पावसामुळे शेतकर्‍यांनी घेतलेल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व बर्‍याच प्रमाणात मिरचीचे पीक पावसामुळे वाया गेली आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे याचा परिणाम मिरचीच्या भावावर झाला आहे अवकाळी पाऊस बदलते वातावरण आणि मिरचीची आवक कमी यामुळे मिरचीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे यावर्षी मसालेचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Back to top button