पुण्यात गोडाऊनला भीषण आग; तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

पुण्यात गोडाऊनला भीषण आग; तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

पुणे : वाघोली परिसरातील उबाळे नगर येथे काल रात्री पावणे बाराच्या सुमारास आगीची घटना घडली. शुभ सजावट मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीची घटना समजताच अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीएच्या ४ अशा एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन जवानांच्या साह्याने आग आटोक्यात आणली. या घटनेत ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेल नाही. पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग नियंत्रणात आणली आहे. गोडाऊनच्या शेजारीच ४०० भरलेले सिलेंडर होते. मात्र योग्य वेळी आगीवर नियंत्रण आणल्याने पुढील धोका टळला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news