कुरकुंभ : महिला प्रवाशाच्या बॅगमधून ४ लाख २५ हजार रूपयांचे दागिने लंपास

कुरकुंभ : महिला प्रवाशाच्या बॅगमधून ४ लाख २५ हजार रूपयांचे दागिने लंपास
Published on
Updated on

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : एसटी बसमधील महिला प्रवाशाच्या बॅगमधून ४ लाख २५ हजार रूपयांचे सोन्याच्या वस्तू अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निता बंडू डोंबाळे (वय ४०, रा. नानवीज, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि. ३० एप्रिल) रोजी फिर्यादी या एसटी बसने प्रवास करीत होत्या. दौंड ते कुरकुंभ प्रवासात त्याची बॅगेतील सोन्याचे चार तोळ्याचे गंठण, दोन तोळ्याचे मिनी गंठण, दिड तोळ्याचे डोरले, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या असा मिळून मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत शुक्रवारी (दि. ५ मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास श्रीरंग शिंदे करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news