पुणे शहरातील मोबाईल चोरटे झाले उदंड

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांकडून पादचार्‍यांना लक्ष्य केले जात आहे. अचानकपणे बहाणा करीत जवळ येऊन मोबाइल हिसकावले जात आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः निर्मनुष्य परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांकडून पादचार्‍यांना टार्गेट केले जात असल्याचे चित्र आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाचा पाच हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना 4 मेला रात्री दोनच्या सुमारास नवी पेठेतील विठ्ठल मंदिरासमोरील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी विनोद बिराजदार (वय 21 रा. नवी पेठ) याने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. विनोद स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असून, नवी पेठेत राहायला आहे. 4 मे रोजी रात्री दोनच्या सुमारास तो मोबाइलवर बोलत रस्त्याने पायी चालत होता. त्या वेळी दोन दुचाकीवर आलेल्या चौघा चोरट्यांनी जबरदस्तीने विनोदजवळील पाच हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

20 हजारांचा मोबाईल पळवला

तिघा चोरट्यांनी तरुणाला दमदाटी करून त्याच्याकडील मोबाइल आणि इतर साहित्य असा 20 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरी केला. ही घटना 5 मे रोजी कोथरूडमधील इंपीरियल गोल्ड इमारतीच्या पार्किंगसमोर घडली. याप्रकरणी रोहित कळंबटे (वय 24, रा. सुतारदरा, कोथरूड) याने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित हा 5 मे ला कोथरूडमधील इंपीरियल गोल्ड इमारतीच्या पार्किंगसमोरून रस्त्याने पायी जात होता. त्या वेळी परिसरात आलेल्या तिघांनी रोहितला धमकावून 100 रुपयांची रोकड, मोबाइल व लॅपटॉप असा 20 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news