तळेगाव दाभाडे : अवकाळी पावसामुळे एकच धांदल | पुढारी

तळेगाव दाभाडे : अवकाळी पावसामुळे एकच धांदल

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे परिसरात श्री क्षेत्र भंडारा डोंगर, इंदोरी,देहु फाटा आदी ठिकाणी गुरुवारी (दि.०४) सायंकाळी सुमारे ५वा.पासुन वादळी वा-यांसह तुफान अवकाळी पाऊस पडला. लग्नाची मोठी तिथी असल्यामुळे विवाह कार्यालयांमध्ये एकच धांदल उडाली आहे. अनेक मंगल कार्यालयात पावसाचे पाणी शिरल्यामुळे आडोशाला बसण्यासाठी नागरिकांची पळापळ झाली.

परिसरात पाणीच पाणी आणि चिखल झाला. कार्यालयांसमोर झालेल्या चिखलांमुळे चारचाकी गाड्या काढण्यासाठी वाहन चालकांना त्रासदायक झाले होते. सतत पडणा-या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या फळांचे फारच नुकसान होत आहे.  या पावसामुळे आणखी नुकसान झाले आहे. हा पाऊस साधारण दीड तास सुरु होता नंतर आकाश निरभ्र होवून स्वच्छ वातावरण झाले.

Back to top button