पुणे शहरात गार वारे; पाच दिवस पावसाचा अंदाज | पुढारी

पुणे शहरात गार वारे; पाच दिवस पावसाचा अंदाज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात गुरुवारपासून गार वारे सुटले असून, ढगांची गर्दी झाल्याने पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची हालचाल सुरू झाली असून, ते 6 मे पासून सक्रिय होत आहे त्यामुळे शहरावरही दुपारनंतर दाढ ढगांची गर्दी झाली. बुधवारी रात्री पावसाळी हवा शहरात सुटली होती. असे वातावरण पहाटेपर्यंत होते. मध्यरात्री काही भागात पाऊस झाल्याने सकाळी सात वाजेपर्यंत गारवा सुटला होता. गुरुवारी दुपारी पुन्हा गार वारा सुटला; मात्र पाऊस पडला नाही.

दरम्यान शहरावर असलेल्या ढगांच्या गर्दीमुळे तापमानात दोन अंशांनी घट झाली. कमाल तापमान 36 वरून 34 अंशांपर्यंत खाली आले तर आर्द्रताही 60 टक्यांवर गेल्याने गारठा अधिकच वाढला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आगामी पाच दिवस शहरात
पावसाची शक्यता आहे. 9 मेपर्यंत सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे.

Back to top button