Honey Trap : पुण्यातील अधिकारी पाकिस्तानी ISIच्या हनी ट्रॅप जाळ्यात? ATS कडून गुन्हा दाखल, गोपनीय माहिती पुरवल्याचा संशय | पुढारी

Honey Trap : पुण्यातील अधिकारी पाकिस्तानी ISIच्या हनी ट्रॅप जाळ्यात? ATS कडून गुन्हा दाखल, गोपनीय माहिती पुरवल्याचा संशय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संवेदनशिल शासकिय गुपीत माहिती शत्रु राष्ट्र असलेल्या पाकीस्तानला पुरविल्याप्रकरणी पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) डीफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑरगानायझेशन (DRDO) च्या शास्त्रज्ञाला अटक केली. त्याला न्यायालयाने 9 मेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात त्याने पाकीस्तानच्या इंटेलिजन्सचा ऑपरेटीव्ह ( पीआयओ) हस्तकाशी संपर्क साधल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. (Honey Trap)

प्रदिप कुरूलकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. याप्रकरणाची चौकशी तीन आठवड्यांपासून सुरू होती. डीआरडीओमधील उच्च पदस्थ अधिकार्‍यावर झालेली ही कारवाई चिंतेची असली तरी तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या चौकशीला गुन्हा दाखल करून अंतीम रूप देण्यात आले.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 मे रोजी पुणे येथील डीआरडीओच शास्त्रज्ञ कुरूलकर यांनी कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्य बजावीत असताना त्यांनी पाकीस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह हस्तकाशी सामाजिक माहिती व्हॉटसअ‍ॅप व्हाईस मेसेज, व्हिडीओ कॉलने संपर्कात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शास्त्रज्ञाने पदाचा गैरवापर कराताना कर्तव्यावर असताना त्याच्या ताब्यात असेली शासकिय गुपीत माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा ठपका ठेवत त्याना संशयास्पद हालचालीवरून पुणे एटीएसने बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान त्यांच्यावर मुंबई येथील काळा चौकी पोलिस ठाण्यात शासकीय गुपीते अधिनियम 1923 कलम 03 (1)(क)05(1)(अ), 05(1)(क), 05(1)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शास्त्रज्ञाने नेमकी कोणती गोपणीय माहिती पाकिस्तानला पुरवली याचा तपास एटीएसकडून सध्या सुरू आहे. त्यांच्यासोबत काम करणारे इतर कर्मचार्‍याची देखील एटीएसकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

हनी ट्रॅपचा संशय

डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ संचालक प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (Honey Trap) अडकवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवल्याचा संशय आहे. शास्त्रज एटीएसकडून त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात कसे आले. त्यांनी नेमकी काय माहिती पुरविली, यादृष्टीने तपास सुरु आहे. कुरुलकर नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार होते.

हेही वाचा

Back to top button