पिंपरी : कमाई शंभर रुपयांची दंड हजारांचा… होकर्स झोनअभावी फेरी विक्रेत्यांची होतेय फरफट ! | पुढारी

पिंपरी : कमाई शंभर रुपयांची दंड हजारांचा... होकर्स झोनअभावी फेरी विक्रेत्यांची होतेय फरफट !

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : आम्हा गरिबाला वाली नाही! रोजची कमाई शंभर रुपयांची होते. गेल्या दहा वर्षांपासून गाडा घेऊन फिरतो आहे आम्ही… पालिकेला हॉकर झोनची मागणी केली होती; परंतु याचा उपयोग झाला नाही. अचानक अतिक्रमणाची गाडी येते, हजाराची पावती फाडते… केवळ शंभर रुपये कमाई असल्यावर दंड हजाराचा भरावा लागतो… अशी व्यथा पिंपळे गुरवच्या स्थानिक फेरी विक्रेत्यांनी मांडली. पिंपरी चिंचवडचे शहरीकरण होताना उपनगरे वाढू लागली. आयटी क्षेत्रात वस्त्या वाढल्या. स्मार्ट रस्ते झाले, परंतु फेरीवाल्यांचा प्रश्न अनुत्तरित राहिला.

पिंपळे गुरव येथील सात फुटी रोडवरील ओंकार कॉलनीलगत रस्त्यावर रोजची जवळपास साठ- सत्तर फेरी विक्रेत्यांच्या रांगा विश्वकर्मा मंदिरापर्यंत रोजच्या पाहायला मिळतात. पिंपळे गुरवमधील सात फुटी रोडवरील अमृता कॉलनी, कृष्ण राज कॉलनी, गुरू दत्त नगर अशा नागरी वस्त्यांतील स्थानिक नागरिक भाजीपाला, इतर गोष्टी खरेदीकरिता याच रस्त्यावर येतात. नवी सांगवीतील साई चौकात मंडई उभारण्यात आली. परंतु आजतागायत पिंपळे गुरवमधील फेरीविक्रेत्या साठी कोणतीही मंडई झाली नाही.आरक्षित हौकर्स झोन बनवण्यात आला नाही.

पिंपळे गुरवमधील सृष्टी चौक आणि सात फुटी रोड, काटे पुरम चौक महत्त्वाचं वाहतुकीचा मार्ग असून दापोडी,पिंपळे गुरव इतर भागाकडे जाणारा याच रस्ताचा वापर केला जातो. याच रस्त्यावर मोठ्या संख्येनं विविध वस्तू आणि भाजीपाला,खाद्य विक्रीफळ विक्रेत्यांना जागा नसल्याने रस्त्यावर विक्रीस गाडे उभ्या केल्या जातात. वाहतूक कोंडी प्रश्न निर्माण होतो. अतिक्रमण विभागाची गाडी जागी आल्यावर काहींची पळापळ होते. परिणामी फेरी विक्रेत्यांवर कारवाई होते.

पिंपळे गुरवमधील विक्रेत्यांना विक्री करण्यासाठी हक्काची जागा मात्र मिळत नाही. पालिकेकडून अतिक्रमण विभागाची कारवाई होते. पण फेरी विक्रेत्यांच्या जागा प्रश्नावर बोलल जात नसल्याची खंत या वेळी काहींनी बोलून दाखवली.

आमच्या फेरी विक्रेत्याची मात्र जागे अभावी फरफट होते. आमचा गरिबाला कुणी वाली नाही.आम्ही आमचं कुटूब कसं चालवायचं.? आम्हाला आरक्षित होकर्स झोन द्यावा.
                                                   – वसंत गुंजकर, स्थानिक फेरी विक्रेता

सात फुटी रोडवरील रस्त्यावर फेरी विक्रेत्यांची गर्दी असते. स्थानिकांसाठी याभागात अजूनही खडकीप्रमाणे एकही मंडई असण्याची गरज आहे. फेरी विक्रेत्यांसाठी आरक्षित जागा असणं गरजेचं आहे.
                         स्थानिक रहिवाशी महिला, ओंकार कॉलनी, सात फुटी रोड

Back to top button