पुणे : मागणीअभावी खाद्यतेले आणखी उतरली; वनस्पती तूप महागले | पुढारी

पुणे : मागणीअभावी खाद्यतेले आणखी उतरली; वनस्पती तूप महागले

पुणे : खाद्यतेलांची आयात कमी दराने होत असल्यामुळे खाद्यतेलांचे दर मंदीतच असून, गेल्या आठवड्यातही दरात 25 ते 50 रुपयांपर्यंत घट झाली. मात्र वनस्पती तुपाच्या दरात डब्यामागे आणखी पंचवीस रुपयांनी वाढ झाली. आवक -जावक साधारण असल्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी तसेच तांदळाचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. महिनाअखेर असल्यामुळे भुसार बाजारातील व्यवहार मंदावल्याचे सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांचे दर सातत्याने घसरत असून, गेल्या आठवड्यातही सोयाबीन, पाम तसेच सूर्यफूल तेलाचे दर आणखी उतरले. येथील घाऊक बाजारातही महिनाअखेर असल्याने खाद्यतेलांस मागणी कमी होती. यामुळे शेंगदाणा तेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे 40 ते 50 रुपयांनी तर सोयाबीन, पाम तसेच सूर्यफूल तेलाच्या दरात 25 ते 30 रुपयांनी घट झाली. मात्र, वनस्पती तुपाच्या दरात डब्यामागे पंचवीस रुपयांनी वाढ झाली. आवक कमी असल्यामुळे सरकी तेलाच्या दरात फारशी घट झाली नाही.

कच्च्या तसेच रिफाईंड पाम तेलावरील आयात शुल्कातील तफावत कमी झाली असून, सध्या रिफाईंड तेलाची आयात अधिक प्रमाणात होत आहे. कच्चा पाम तेलापासून रिफाईंड तेल तयार करताना त्यातून निघणार्या स्टेरिनचा वापर वनस्पती तूप तयार करण्याकरिता केला जातो. सध्या कच्चा पामतेलाची आयात कमी प्रमाणात होत असल्याने स्टेरिनाचा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे वनस्पती तुपाचे दर वाढेत आहेत, असे कन्हैयालाल गुजराथी यांनी सांगितले. आवक-जावक साधारण असल्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी तसेच तांदळाच्या दरात कोणताही फेरबदल आढळला नाही. मागणीअभावी आटा, रवा आणि मैद्याचे दरही टिकून असल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3675 ते 3700 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर): शेंगदाणा तेल 2750-2825, रिफाईंड तेलः 2650-3400, सरकी तेल 1475-1800, सोयाबीन तेल 1475-1800, पामतेल 1400-1600, सूर्यफूल रिफाईंड तेल 1550-1770,

वनस्पती तूप 1500-1900, खोबरेल तेल 2250 रु. तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसूरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509- 8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम. पी. लोकवन नं.1 3600-3800, नं. 2 3400-3600, सिहोर 4800-5500, सिहोरी 3400-3800, मिलबर 2350-2450 रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5000-5500, गावरान नं. 2-4600-4900, नं. 3 4200-4500, दूरी 3500- 3900 रु. बाजरी : महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु. गूळ : गूळ एकस्ट्रा 4000-4150, गूळ नं. 1 3850-3950, गूळ नं. 2 3700-3800, गूळ नं.3 3600-3650, गूळ नं. 4 3450-3550, बॉक्स पॅकिंग 3700-4800 रु. डाळी : तूरडाळ 11000-12400, हरभराडाळ 5900-6100, मूगडाळ 9400-10600, मसूरडाळ 7400- 7500, मटकीडाळ 10000-11000, उडीदडाळ 9000-10700 रु.

कडधान्ये : हरभरा 5400-5500, हुलगा – 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000- 8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-11700, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु. साबुदाणा : साबुदाणा नं. 1 7000, साबुदाणा नं. 2 6800, साबुदाणा
नं. 3 6500 रु. वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1100-1300 रु. शेंगदाणा : जाडा 11700-12200, स्पॅनिश – 11300-11600, घुंगरु 10500 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल : 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 4000-4400, पेण 4000-4300, मध्यम पोहा-3800-4300, दगडी पोहा 3800- 4400, पातळ पोहा 4400-5200, सुपर पोहा 4400-4700, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2800-3200, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 750-850, घोटी 450- 475, सुरती 475-500 रु. रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1450-1500, रवा 1475-1525, मैदा 1475-1525, बेसन : (50 किलोस) 3300-3600 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 250 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 57500-60000, लवंगी तेजा 24000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु. नारळ : (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1100-1200, मद्रास 2300-2500, पालकोल जुना 1400- 1450, सापसोल 2000-2700 रु.

Back to top button