पुण्यातील केशवनगरमध्ये एका व्यक्तीचा खून; आज दिवसभर दुकाने बंद, ग्रामस्थांचा निर्णय | पुढारी

पुण्यातील केशवनगरमध्ये एका व्यक्तीचा खून; आज दिवसभर दुकाने बंद, ग्रामस्थांचा निर्णय

पुणे : केशवनगर येथील गुरुकृपा सोसायटीच्या पाठीमागे रविवारी (ता.30) दुपारी साडेतीन वाजता रविंद्र गायकवाड (वय 59) यांचा गुंडप्रवृत्तीच्या चार-पाच तरुणांनी कोयता आणि धारदार शस्त्राने खून केला. संबंधीत गुन्हेगारांची मुंढवा-केशवनगर येथून धिंड काढावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज मुंढवा येथील राम मंदिरामध्ये ग्रामस्थांनी मिटींग आयोजित केली होती. स्थानिक नागरिक आणि मुंढवा पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

जोपर्यंत संबंधित गुन्हेगारांची गावातून धिंड काढली जात नाही. तोपर्यंत मुंढवा केशवनगर मधील सर्व दुकाने आणि व्यवहार बंद ठेऊ अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. या वेळी सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले होते. संबंधित गुन्हेगारांवर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले.

मुंढवा-केशवनगर परिसरातील वाढती गुन्हेगारी तसेच काल घडलेल्या घटनेतील संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करुन आज दिवसभर मुंढवा-केशवनगर येथील सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

Back to top button