पुणे : दोघा चंदन चोरट्यांना बेड्या, सात गुन्ह्यांचा छडा

पुणे : दोघा चंदन चोरट्यांना बेड्या, सात गुन्ह्यांचा छडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चंदनाच्या झाडांची चोरी करणार्या दोघा अट्टल चोरांना चतुःश्रुंगी पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 25 किलो चंदनाची झाडे जप्त करण्यात आली असून सात गुन्हे उघडकीस आले आहेत. वैलास साहेबराव अगिवले (21, रा. बाभुळवडे, जि. नगर), सुुनिल सुरेश अगिवले (20, रा. संगमनेर, नगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

आरोपींना पाषाण रस्त्यावरील एनसीएल परिसरातून अटक करण्यात आली. शहर परिसरात काही दिवसांपासून चंदनचोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजभवन तसेच एनसीएल भागात चंदनचोरीचे गुन्हे घडले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.25) रात्री चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यातील मार्शल सुरेश काशिद, अशोक ननवरे हे गस्तीवर होते. ते एनसीएल येथे पेट्रोलिंग करत असतानाच दोघेजण त्यांना बघून झाडातून पळून जावू लागले. संशय आल्याने पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.

त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी या भागात चंदनचोरी केल्याचे समोर आले. त्यांच्याकडून पोलिसांनी चंदनाचे झाड कापण्यासाठी लागणारे दोन करवत, कुर्हाड, ग्रीमेंट असे साहित्य मिळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 25 किलो चंदनाची लाकडे जप्त करण्यात आली असून चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यातील सात गुन्हे उघडकीस आले आहेत. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक, कपील भालेराव, कर्मचारी श्रीकांत वाघवले, इरफान मोमीण, अशिष निमसे, बाबुलाल तांदळे, मारूती केंद्रे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news