चिपको आंदोलन: पुण्यात नदी सुधार विरोधात पर्यावरण प्रेमींची जोरदार रॅली | पुढारी

चिपको आंदोलन: पुण्यात नदी सुधार विरोधात पर्यावरण प्रेमींची जोरदार रॅली

पुणे, पुढारी वृत्तसेवा: नदी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, आर एफ डी हटाव, सदोष आर एफ डी राबवणार यांचे करायचे काय, झाडे लावा झाडे जगवा, आम्ही निसर्ग सेवक या सारख्या विविध घोषणा देत पर्यावरण प्रेमींनी सुधार प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रॅली काढली.

या रॅली रॅलीमध्ये काही पक्षांच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला होता. पुण्यातील हजारांच्या संख्येने पर्यावरण प्रेमी यात सहभागी झाले होते. सायंकाळी चारच्या सुमारास संभाजी उद्यान येथून ही रॅलीला सुरुवात झाली. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नियोजित नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. नदी सुधार प्रकल्पामुळे नदीपात्रातील अनेक झाडे कापली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे, म्हणून पर्यावरण प्रेमींनी ही रॅली काढली असल्याचे त्यांनी सांगितले. संभाजी उद्यान येथून निघालेली ही रॅली पीएमपीच्या डेक्कन बस स्टॉप पासून खाली उतरून गरवारे पुलापर्यंत गेली. रॅली नदीपात्रात आल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी नदीपात्रातील झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन केले.

Back to top button