पिंपरी : आरटीईच्या 3280 जागांपैकी 987 जागांवर प्रवेश | पुढारी

पिंपरी : आरटीईच्या 3280 जागांपैकी 987 जागांवर प्रवेश

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठीचे 25 टक्के आरक्षण जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून आत्तापर्यंत 3280 जागांपैकी आरटीईचे 987 प्रवेश झाले आहेत. या वर्षी 172 शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. तर आरटीईसाठी 3280 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये आकुर्डी उन्नत केंद्रअंतर्गत येणार्‍या शाळांमध्ये 2184 जागांपैकी 710 प्रवेश झाले आहेत, तर पिंपरी उन्नत केंद्रांतर्गत येणार्‍या शाळांमध्ये 1096 जागांपैकी 340 जागांवर प्रवेश झाले आहेत.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या प्रवेशप्रक्रियेत अद्याप 50 टक्केदेखील प्रवेश झालेले नाहीत. सुरुवातीला आठ ते दहा दिवस साईट हँग होत असल्याने प्रवेशच झाले नाहीत. प्रवेशप्रक्रियेसाठी 8 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. इतक्या संथ गतीने प्रवेशप्रक्रियेचे काम सुरू असल्याने दिलेल्या मुदतीत उपलब्ध जागांवर प्रवेश होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Back to top button