पुणे गुन्हे शाखेकडून 162 चोरीच्या दुचाकी जप्त; बीड, उस्मानाबादसह लातूर परिसरात पोलिसांचे सर्च ऑपरेशन | पुढारी

पुणे गुन्हे शाखेकडून 162 चोरीच्या दुचाकी जप्त; बीड, उस्मानाबादसह लातूर परिसरात पोलिसांचे सर्च ऑपरेशन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या तब्बल 162 दुचाकी जप्त केल्या आहेत. बीड, उस्मानाबाद आणि लातूर परिसरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत या गाड्या जप्त केल्या आहेत. 54 लाख 67 हजार रुपयांचा हा मुद्देमाल आहे. याप्रकरणी एकूण 17 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यातून चोरी केलेल्या या दुचाकी हे चोरटे ग्रामीण भागात विक्री करत होते. गुन्हे शाखेचे पोलिस ग्रामीण भागात वेशांतर करून तब्बल एक महिना आरोपींच्या मागावर होते. मागील काही वर्षांतील वाहनचोरीची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे दिसून येते.

Back to top button