नवी सांगवी : जलतरणपटूंची अवस्था ‘कम खुशी जादा गम’! | पुढारी

नवी सांगवी : जलतरणपटूंची अवस्था ‘कम खुशी जादा गम’!

नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महापालिका जलतरण तलावात पोहण्यासाठी प्रवेशिका ऑनलाइन बुकिंगद्वारे राबवीत असल्यामुळे हौशी जलतरणपटूंची अवस्था ‘कम खुशी जादा गम’ अशी झाली आहे. नवी सांगवी, पिंपळे गुरव शेजारील दापोडी, बोपोडी परिसरात जलतरण तलाव उपलब्ध नाही आणि जुनी सांगवी येथील तलावाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यातच हा भाग प्रचंड दाट लोकवस्तीचा असल्याने येथील काळुराम जगताप जलतरण तलावाला लहान मोठे तरुण-तरुणींसह सर्वच पोहण्यासाठी या तलावाला पसंती देत आहेत.

समर कॅम्पसाठी तलाव उपलब्ध

सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत खासगी संस्थांना समर कॅम्पसाठी तलाव उपलब्ध आहे. स्वच्छतागृह आणि कपडे बदलण्याच्या खोल्या सुस्थितीत असल्या तरी महिलांकरिता कपडे बदलण्यासाठी वेळ वाढवून मिळण्याची मागणी होत आहे. मागील 17 वर्षांपासून पोहण्याचा तलाव येथे सुरू आहे. व्यवस्थापक विशाल गायकवाड, ऑनलाईन तपासणी राकेश ढोरे, जीवरक्षक तानाजी ढमाळ, दत्तात्रय मिसाळ हे या तलावावर तत्परतेने कार्यरत असतात. त्यामुळे अद्याप येथे कोणताही जलतरणपटू पाण्यात बुडाल्याची एकही दुर्दैवी घटना घडली नाही. सोनसाखळी, मोबाइल घड्याळ यासारख्या मौल्यवान वस्तू या दोघांनी प्रामाणिकपणे परत केल्या आहेत.

पोहण्याच्या प्रवेशिका ऑनलाइन

महापालिकेने पोहण्याच्या प्रवेशिका ऑनलाइन बुकिंगद्वारे चालू केल्याने त्या सर्वांनाच उपलब्ध होतील, अशी परिस्थिती नाही. या जलतरण तलावाच्या परिसरात बॅडमिंटन हॉल, वाचनालय, खुली व्यायाम शाळा, आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. हा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीने संरक्षित असला तरी येथे एकच सुरक्षारक्षक कार्यान्वित आहे. त्यामुळे याठिकाणी सुरक्षारक्षक वाढवण्याची मागणी स्थानिक
करीत आहेत.

  • किमान एक दिवस आधी बुकिंग करावे लागते.
  • एक व्यक्ती तीन जणांचे प्रवेशिका बुक करू शकतो.
  • एक आठवडापेक्षा आधी बुकिंग होत नाही.
  • ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना रांगेत उभे न राहता या ऑनलाइन बुकिंगची चांगली सोय झाली आहे.

पोहण्याची वेळ ः सकाळी 6 ते 10 यात चार बॅच, पैकी 9 ते 9 : 45 करिता. आणि दुपारी 2 : 30 ते 6 : 30 तेथेही चार बॅच त्यापैकी 2 : 30 ते 3 : 15 महिलांकरिता राखीव.
प्रत्येक बॅचमध्ये केवळ 80 बुकिंगमुळे जलतरणपटूंना प्रवेश.

Back to top button