पुणे; पुढारी वृत्तसेवा : भूगर्भाखालील तेल, वायू व ऊर्जा शोधण्यासाठी तंत्रज्ञान परदेशातून आणावे लागत होते. अगदी माफक खर्चात स्वदेशी बनावटीचे सॉफ्टवेअर पुण्यातील सीडॅकने विकसित केले आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दि.28) हिंजवडी येथे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली पाहणे या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
हायड्रोकार्बनच्या ड्रीलिंग स्थानाबद्दल भूकंपानंतर तयार झालेल्या पृष्ठभागाची प्रतिमा गरजेची असते. भूकंपीय डेटा वापरून रिव्हर्स टाइम मायग्रेशन (आरटीएम) हे स्वदेशी बनावटीचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. तेल आणि वायू हे ऊर्जानिर्मिती आणि त्याच्या वाहतुकीचे प्रमुख घटक आहेत. जमिनीवर किंवा सागरी वातावरणात, तेल आणि वायूचे साठे शोधू शकतात.
तेल आणि वायू साठ्यांच्या शोध घेण्याकरिता त्याच्याबद्दलचा डेटा गोळा करण्यासाठी भूकंपीय अन्वेषणाचे सर्वेक्षण केले जाते. हायड्रोकार्बन्सच्या ड्रिलिंगच्या स्थानांबद्दल निर्णय घेण्यासाठी या प्रतिमा आवश्यक असतात. रिव्हर्स टाइम माइग्रेशन (आरटीएम) हे सध्या भूकंपीय डेटा वापरून भूपृष्ठाच्या संरचनेची प्रतिमा काढण्यासाठी सर्वांत प्रभावी पद्धत आहे. सी-डॅक, पुणे येथे सिस्मिक डेटा प्रोसेसिंग ग्रुपची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली आहे. हा ग्रूप प्रामुख्याने एचपीसी (कझउ) सिस्मिक इमेजिंग ऍप्लिकेशन्सच्या विकासावर काम करत आहे.