पुण्यात श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी | पुढारी

पुण्यात श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : धनकवडी येथे श्री सद्गुुरू शंकर महाराज यांच्या 76 व्या समाधी सोहळ्यानिमित्त मठात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. यानिमित्त शुक्रवारपर्यंत (दि.28) मुक्त महाप्रसादचे आयोजन केले आहे. श्री सद्गुुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी बुधवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री सद्गुुरू शंकर महाराज समाधी मठाच्या प्रवेशद्वाराच्या प्रांगणात मुक्त महाप्रसादचे आयोजन केले.

गेल्या 17 वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या सोहळ्यानिमित्त श्री सद्गुुरू शंकर महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. तसेच मुक्त महाप्रसाद सप्ताह अंतर्गत हजारो भाविक दररोज महाप्रसादाचा लाभ घेत आहे.
गेल्या आठवडाभर श्री सद्गुुरू शंकर महाराज यांच्या मूर्तीसमोर दररोज आंबे, द्राक्ष, केळी व तुळस आदींची आकर्षक सजावट करण्यात येत आहे. अन्नछत्र समिती ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ रेवडे, पदाधिकारी प्रशांत सूर्यवंशी, प्रवीण पासलकर, निखिल वाघमारे, नीलेश कोटकर आदी या सोहळ्याची व्यवस्था पाहात असल्याची माहिती प्रसिद्धिप्रमुख सुहास रानवडे यांनी दिली.

Back to top button