बेलसरचे आरोग्य अधिकारी डांगे बेपत्ता

बेलसरचे आरोग्य अधिकारी डांगे बेपत्ता

बेलसर : पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर (ता. पुरंदर) येथील आरोग्य अधिकारी डॉ. सागर तुळशीराम डांगे (वय 36) हे मंगळवार (दि. 25) पासून बेपत्ता असल्याची खबर त्यांची पत्नी शुभांगी डांगे यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात दिली. सागर डांगे हे मूळचे वडाळी (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील आहेत.

डॉ. सागर डांगे हे मंगळवारी सकाळी 8.30 वाजता बेलसर येथील सरकारी रुग्णालयातून बेपत्ता झाले आहेत. डॉ. डांगे हे सध्या सासवड (ता. पुरंदर) येथे वास्तव्यास होते. त्यांचा रंग गोरा, उंची 5.5 फूट, केस काळे, चेहरा उभट असून, पायात काळ्या रंगाची चप्पल, उजव्या हातावर डॉक्टरचा टॅटू गोंदवलेला आहे. अंगात जीन्स पँट व मेंदी रंगाचा शर्ट असून, त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात. या वर्णनाची व्यक्ती दिसून आल्यास जेजुरी पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news