

पुणे : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.
राज्यात 25 एप्रिल रोजी 722 नवीन रुग्णांचे निदान झाले, 946 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के, तर मृत्यूदर 1.81 टक्के इतका आहे. मार्च 2020 पासून आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8 कोटी 69 लाख नमुन्यांपैकी 81 लाख 62 हजार म्हणजेच 9 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागले – 29 मार्चपासून
साप्ताहिक रुग्णसंख्या 6000 हून अधिक – 12 एप्रिल ते 18 एप्रिल
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात – 20 एप्रिलनंतर
उपाययोजना :
आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
चाचण्या वाढवणे, मास्कचा वापर
लसीकरणाचेही आवाहन