पिंपरी: आरटीई प्रवेश कागदपत्रांची पूर्तता करण्यास पालकांना विलंब | पुढारी

पिंपरी: आरटीई प्रवेश कागदपत्रांची पूर्तता करण्यास पालकांना विलंब

पिंपरी (पुणे) : आरटीई प्रवेशासाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करण्यास पालकांनी विलंब केल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. यासाठी आरटीई प्रवेशाला परत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या कालावधीत पालकांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन शिक्षण प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या वेळी वेबसाईट हँग, प्रवेशाची यादी जाहीर करण्यास विलंब या कारणामुळे प्रवेशप्रक्रियेस अडथळा निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणी समितीकडून आवश्यक असणार्‍या सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात येते. त्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे आरटीई कागदपत्र पडताळणी समिती नेमण्यात आली आहे. पालकांकडे एक कागदपत्र आहे तर एक नाही अशी अवस्था आहे. पालक गावाकडे असल्यामुळे काही पालकांकडे जातप्रमाणपत्र, दाखले नाहीत. तसेच घरच्या पत्त्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता नाही. बर्‍याच पालकांकडे रजिस्टर नोंद असलेल्या भाडे करारनाम्याची पूर्तता करता आली नसल्यामुळे पहिल्या फेरीत नंबर लागूनही केवळ कागदपत्रांच्या अडचणींमुळे प्रवेश धोक्यात आले आहेत.

Back to top button