पुणे विभागातील चार रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित

पुणे विभागातील चार रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अन्न आणि औषध प्रशासनाने पुणे विभागातील चार रक्तपेढ्यांचे परवाने रद्द केले आहेत. यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील रक्तपेढ्यांचा समावेश आहे. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 च्या विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल 25 हून अधिक रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील रक्तपेढ्यांची नियमित तपासणी करण्यात आली आहे.

शिबिरानंतर संकलित झालेल्या रक्ताची नोंद, कर्मचार्‍यांची उपलब्धता, तांत्रिक बाबी, अस्वच्छता, रक्तसाठा अशा विविध निकषांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्याबाबत औषध निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत पुणे विभागातील 103 रक्तपेढ्यांच्या सखोल तपासणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. छाननीच्या फेर्‍यांमध्ये, रक्तपेढ्यांमध्ये कोल्ड चेन न राखणे, रक्तसंक्रमण अधिकार्‍यांशिवाय यांसारख्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.

औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत पुणे विभागातील रक्तपेढ्यांवर कारवाई करण्यात आली. टेक्निकल स्टाफची कमतरता, रक्तदात्यांची, रक्त संकलनाची नोंद न ठेवणे, कोल्ड चेनमध्ये त्रुटी अशा बाबी आढळून आल्या.
                          – डॉ. एस. व्ही. प्रतापवार, सहसंचालक, एफडीए, पुणे विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news