पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनरला अचानक आग; फ्रिज जळून मोठे नुकसान | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनरला अचानक आग; फ्रिज जळून मोठे नुकसान

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : चेन्नईमधून फ्रिज घेऊन निघालेला कंटेनर चौफुला परिसरात अचानक पेटल्याने रेफ्रिजरेटर (फ्रिज)चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकवर असलेल्या बंद कंटेनरमधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर सुरू झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या कंटेनरमध्ये चेन्नईतून सॅमसंग कंपनीचे रेफ्रिजरेटर भरून आणले होते आणि ते मुंबईकडे नेण्यात येत होते.

त्यावेळी दुपारी एक ते सव्वा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. प्रचंड धूर येत असलेल्या कंटेनरला पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला. ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. परंतु कंटेनर बाजूला घेईपर्यंत मोठ्या प्रमाणात आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी औद्योगिक विभागातील अग्निशामक दलाला बोलवण्यात आले. त्यांनी आग तत्काळ आटोक्यात आणली. या प्रकाराने सोलापूरकडून पुण्याकडे जाणारा रस्ता काही काळ बंद ठेवण्यात आला. आगीमध्ये कंटेनरमध्ये असलेले रेफ्रिजरेटरचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

Back to top button