पुणे : पीएमपीच्या मालमत्ता उत्पन्नात झाली वाढ | पुढारी

पुणे : पीएमपीच्या मालमत्ता उत्पन्नात झाली वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीला तिकीट विक्रीव्यतिरिक्त मालमत्तेच्या भाड्यातून उत्पन्न मिळत असते. याच उत्पन्नात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात चांगलीच वाढ झाल्याचे समोर आले आहे. पीएमपी प्रशासनाच्या स्वमालकीचे 81 गाळे आहेत. त्यातील 15 गाळे सध्या शिल्लक आहेत. हडपसर, स्वारगेट, डेक्कन आणि मार्केट यार्ड या ठिकाणी असलेल्या या मालमत्तेच्या भाड्यापोटी पीएमपीला 2022-23 या आर्थिक वर्षात 14 कोटी 63 लाख 13 हजार 281 रुपयांचे उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न गेल्या तीन ते चार वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

अ. क्र. आर्थिक वर्ष – पीएमपीला मिळालेले भाडे
1) 2019-20 – 10,98,29,963
2) 2020-21 – 11,67,98,136
3) 2021-22 – 6,83,50,843
4) 2022-23 – 14,63,13,281

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी थकीत भाडेकर्‍यांना नोटिसा, पत्रव्यवहार करण्यास सांगितले. तसेच, सुधारित भाडेदर लागू करण्यात आला असून, वेळोवेळी करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे मालमत्ता विभागाचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत सात कोटींनी वाढले आहे.

            अनंत वाघमारे, बीआरटी व्यवस्थापक तथा मालमत्ता विभाग प्रमुख

Back to top button