राज्यातील मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला गारपिटीचा इशारा | पुढारी

राज्यातील मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला गारपिटीचा इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हिमालयात पश्चिमी चक्रवात होत असल्याने आगामी सात दिवस संपूर्ण देशात कुठेही उष्णतेची शक्यता नाही. या वातावरणामुळे 25 ते 28 एप्रिल दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
ही नवी शीतलहर हिमालयात 26 एप्रिलपासून सक्रिय होत असल्याने संपूर्ण देशावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

हिमालयासह राजस्थान व पुढे मध्य प्रदेश ते तामिळनाडू अशी वार्‍याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातही कमाल तापमानात 1 ते 4 अंशांनी घट राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच देशातील बहुतांश भागांत पाऊस गारपिटीचा अंदाज दिला आहे. यात प्रामुख्याने हिमालय पर्वतरांगा, सिक्कीम, पं. बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागांना हा अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात अत्यंत हलका पाऊस राहील, मात्र मोठ्या पावसाचा अंदाज नाही.

Back to top button