धक्कादायक ! प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाचा उकळत्या पाण्यात बुडवून खून | पुढारी

धक्कादायक ! प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाचा उकळत्या पाण्यात बुडवून खून

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात बुडविले. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार 6 एप्रिल रोजी सकाळी खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडला. विक्रम शरद कोळेकर (रा. कोयाळी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने शनिवारी (दि. 22) चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे अनैतिक संबंध आहेत. दरम्यान, किरकोळ वादातून आरोपीने फिर्यादी यांच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात- पाय धरून बाथरूममधील उकळत्या पाण्यात बुडवले. यामध्ये मुलगा गंभीररीत्या भाजला. मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपीने याबाबत कोठेही वाच्यता न करण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या मानलेल्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button