

पिंपरी : शिरगाव हद्दीतील पवना नदीपात्रालगत सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली. यामध्ये दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. 21) दुपारी करण्यात आली. या प्रकरणी पोलिस अंमलदार मितेश यादव यांनी शिरगाव ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर दोन महिलांनी गावठी दारू तयार करण्याची भट्टी सुरू केली. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी दहा लाख 10 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.