कोरोनावरील लसीचा सहा मिलियन अतिरिक्त साठा ; आदर पूनावाला यांची माहिती | पुढारी

कोरोनावरील लसीचा सहा मिलियन अतिरिक्त साठा ; आदर पूनावाला यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्राची सध्या आम्हाला कोरोना लसीची मागणी नाही. मात्र, आम्ही 6 मिलियन लसीचा अतिरिक्त साठा तयार करून ठेवला आहे. यूएस आणि युरोपमध्ये आपल्याकडील एकाच लसीला मान्यता आहे. परंतु, तिचीही मागणी सध्या खूप कमी आहे. लहान मुलांसाठी आवश्यक असलेली कोव्हक्स लस तयार आहे.

असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितले. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले, आम्ही आम्हाला मिळालेला पैसा हा लसीच्या संशोधनासाठी वापरतो. देशासाठी, देशाबरोबर काम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे

Back to top button