

पिंपरी : गुटखा विक्री गुन्हे शाखेच्या युनिट दोनने एकाला अटक केली. त्याच्याकडून तेरा हजार 814 रुपयांचा गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 20) दुपारी दोन वाजता पिंपरी येथे करण्यात आली आहे. शरीफ इकबाल शेख (25, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिस अंमलदार विपुल जाधव यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी येथे शादलबाबान पान स्टोअर आहे. दरम्यान, आरोपीने स्टोअरमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी ठेवल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट 2 ला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांना तेरा हजारांचा गुटखा मिळून आला.