कोकण, मुंबई आणि ठाणेला ‘वेदर डिस्कम्फर्ट’चा इशारा | पुढारी

कोकण, मुंबई आणि ठाणेला ‘वेदर डिस्कम्फर्ट’चा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अतितापमान, सतत पाऊस अन् त्यामुळे वाढणारी आर्द्रता यामुळे कोकण, मुंबई, ठाणे, केरळ व तामिळनाडू भागाला ‘वेदर डिस्कम्फर्ट’चा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या वातावरणात काम नसेल तर शक्यतो बाहेर पडू नका, असा इशारा हवामान विभागाने दिला. दीड महिन्यापासून राज्यातील बहुतांश भागात अस्वस्थ करणारे वातावरण तयार झाले आहे. अतितापमान, पाऊस अन् वाढती आर्द्रता (याला वेदर डिस्कम्फर्ट असे वैज्ञानिक नाव हवामान तज्ज्ञांनी दिले आहे) प्रामुख्याने मुंबई, ठाणे व कोकणात हा प्रकार जास्त होत आहे. कारण तेथे जास्त आर्द्रता आहे.

अशा वातावरणामुळे उष्माघाताचा जास्त धोका असल्याने भरपूर पाणी प्या, ताक, घरातील सरबत घ्या, असा सल्ला हवामान विभागाने यंदा प्रथमच दिला आहे. दरम्यान, 22 व 23 रोजी राज्यात पावसाचा खंड असून पुन्हा 24 पासून पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच विदर्भात उष्णतेची लाट तीव्र असून तापमानाचा पारा 43 अंशांवर जात आहे. विदर्भ, मराठवाडा या भागात आर्द्रता कमी असल्याने त्या भागाला हा इशारा नाही. मात्र, मध्य पुणे शहरात आर्द्रतेचे प्रमाण 55 ते 60 टक्क्यांवर जात असल्याने तेथेही वेदर डिस्कंम्फर्ट तयार होत आहे. मात्र मुंबई व ठाणे व कोकणच्या तुलनेत तो कमी आहे.

Back to top button