पुणे: शहरात गत चोवीस तासांत 52 मिलिमीटर पाऊस झाला असून, जूनमध्ये एकूण 70 मिमी पावसाचा टप्पा शहराने गाठला आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी शहरातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. मे आणि जून महिन्यातील 25 दिवसांत शहरात 340 मिमी पाऊस झाला आहे.
यंदा शहरावर मान्सून मेहरबान असून मेमध्ये 270 मिमी पाऊस झाला तर 1 ते 13 जूनपर्यंत शहरात 70 मिमी असा मे आणि जून मिळून 340 मिमी पाऊस झाला आहे. मान्सून बरसला. गुरुवारी रात्री दहा वाजता सुरू झालेला पाऊस उत्तर रात्रीपर्यंत सुरूच होता. पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास पाऊस थांबला ,तोवर संपूर्ण शहराला तुफानी पावसाने झोडपून काढले होते. (Latest Pune News)
रात्री 10 ते 10.48 असा सुमारे पाऊण तास पावसाचा मोठा जोर होता. त्यानंतर मात्र पाऊस संततधार वेगाने रात्रभर पडत होता. पावसाचा जोर उत्तर रात्री जास्त नसला तरी रात्रभर भिज पाऊस झाला त्यामुळे पहाटे संपूर्ण शहरात दाट धुके पसरले होते.
सकाळी अकरा वाजेपर्यंत धुक्याची चादर शहरावर होती. त्यानंतर थोडी उघडीप मिळाली. दरम्यान, शुक्रवारी देखील शहरासह जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट होता त्याप्रमाणे सायंकाळी 6 ते 7 या वेळेत मुसळधार पाऊस झाला.
जिल्ह्याला झोडपले
पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील काही भागांत गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस पिंपरी- चिंचवड भागात 46, तर शिवाजीनगर भागात 26.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.
गत चोवीस तासांत पुणे, पिंपरी- चिंचवडसह जिल्ह्यातील काही भागांत मान्सून बरसला. गुरुवारी रात्री दहा वाजता सुरू झालेला पाऊस उत्तर रात्रीपर्यंत सुरूच होता. पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास पाऊस थांबला. तोवर संपूर्ण शहराला तुफानी पावसाने झोडपून काढले होते.
रात्री 10 ते 10.48 असा सुमारे पाऊण तास पावसाचा मोठा जोर होता. त्यानंतर मात्र पाऊस संततधार वेगाने रात्रभर पडत होता. पावसाचा जोर उत्तर रात्री जास्त नसला तरी रात्रभर भिज पाऊस झाला, त्यामुळे पहाटे संपूर्ण शहरात दाट धुके पसरले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत धुक्याची चादर शहरावर होती. त्यानंतर थोडी उघडीप मिळाली.
दरम्यान, शुक्रवारीदेखील शहरासह जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट होता. त्याप्रमाणे सायंकाळी 6 ते 7 या वेळेत मुसळधार पाऊस झाला.