खुशखबर ! उन्हाळी सुटीनिमित्त एसटीच्या पुणे विभागाकडून 59 जादा गाड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत, एसटीच्या पुणे विभागाकडून 59 ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यात पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड डेपोमधून 16 जादा गाड्या धावत आहेत.
दरवर्षी शाळांना सुट्या पडल्या की, गावी जाण्यासाठी एसटी, रेल्वे आणि विमानांना प्रवाशांची गर्दी झालेली दिसते. यंदादेखील तीनही ठिकाणी जादा गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
रेल्वे, विमान आणि एसटी प्रशासनाने उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या आहेत. एसटी प्रशासनाने पुणे विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी-चिंचवड, बारामती या डेपोंमधून एकूण 59 ज्यादा गाड्या सोडल्या आहेत. या ज्यादा गाड्या नागपूर, नाशिक, चिपळूण, लातूर, धुळे, बीड, अक्कलकोट, संभाजीनगर या ठिकाणांसाठी धावत आहेत.