पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे किवळेतील दुर्घटना

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे किवळेतील दुर्घटना

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जाहिरात होर्डिंगचे दरवर्षी स्ट्रक्चर ऑडिट करण्याबाबत राज्य लेखा स्थानिक परीक्षण समितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला विज्ञापन पत्राद्वारे कळविले होते. परंतु, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे किवळे येथील होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली. हा पालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा असून, आकाशचिन्ह व परवाना विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला आहे.

पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, शहरातील जाहिरात होर्डिंगचे भाडेवसुलीमध्ये अनियमितता आढळली होती. पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने सन 2017 मध्ये लेखा विभागाच्या अहवालाचे अवलोकन करून जाहिरात भाडे धोरण व स्ट्रक्चर ऑडिट धोरण ठरवले असते. तर शहरात अनधिकृत होर्डिंग उभे राहिले नसते. या पद्धतीच्या होर्डिंगला आळा बसला असता. दुर्दैवी घटना रोखता आली असती. मात्र, पालिकेने महत्त्वाच्या ज्ञापन पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

त्यामुळे किवळेतील दुर्घटनेतील 5 जणांच्या मृत्यूला व जखमी 3 जणांच्या दुर्घटनेला आकाशचिन्ह व परवाना विभाग कारणीभूत आहे. या विभागाने या अहवालानुसार योग्य कार्यवाही केली असतील, तर ही दुर्घटना टाळता येणे शक्य होते. त्यामुळे या विभागातील कारभाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news