पिंपरी : पिस्तूल बाळगल्याने दोघांना अटक | पुढारी

पिंपरी : पिस्तूल बाळगल्याने दोघांना अटक

पिंपरी : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. सोमवारी (दि. 17) रात्री सव्वाअकराच्या सुमारास जुनी सांगवी येथे ही कारवाई करण्यात आली. सुजल राजेंद्र गिरी (18, रा. जुनी सांगवी), रिहान आरिफ शेख (19, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार आकाश खंडागळे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील गणपती विसर्जन घाटावर दोघेजण संशयितरित्या थांबले असून, त्यांच्याकडे शस्त्र असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 25 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे, दुचाकी असा एकूण 46 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button