पिंपरी : बँकेच्या ताब्यात असलेल्या घरात प्रवेश; दाम्पत्यावर गुन्हा | पुढारी

पिंपरी : बँकेच्या ताब्यात असलेल्या घरात प्रवेश; दाम्पत्यावर गुन्हा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : बँकेकडे गहाण असलेल्या घरात दांपत्याने बेकायदा प्रवेश केला. ही घटना मंगळवारी (दि. 18) सायंकाळी राजे शिवाजीनगर, चिखली येथे घडली. संजय नारायण पवार आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्रसिंग भाऊसिंग जगताप (50, रा. चिंचवड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एनकेजीएसबी बँकेकडून कर्ज काढले. या कर्ज प्रकरणामध्ये आरोपींनी राजे शिवाजीनगर येथील एक मालमत्ता तारण ठेवली. आरोपींनी वेळेत कर्जफेड न केल्यामुळे बँकेने कायदेशीर प्रक्रिया करून सदर मिळकतीवर ताबा घेतला. हा प्रकार माहिती असूनही आरोपींनी सीलबंद कुलूप तोडून मिळकतीत प्रवेश केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button