बाधितांपैकी 95 टक्के गृहविलगीकरणात | पुढारी

बाधितांपैकी 95 टक्के गृहविलगीकरणात

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. सध्या 6087 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 95 टक्के रुग्ण गृहविलगीकरणात, तर 5 टक्के रुग्णालयात दाखल आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कोरोनाबाधितांचे दैनंदिन आणि साप्ताहिक निरिक्षण केले जात आहे. सध्या एक्सबीबी 1.16 या व्हेरियंटचे रुग्ण सापडत आहेत. मात्र, बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.

सक्रिय 6087 रुग्णांपैकी 5795 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर, 292 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात दाखल असणा-यांपैकी केवळ 46 जण म्हणजेच 0.7 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. राज्यात बुधवारी 15 हजार 313 चाचण्या झाल्या. त्यापैकी 949 नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले. म्हणजेच, सध्याचा पॉझिटिव्हिटी दर 6 टक्के आहे. बुधवारी 912 रुग्ण बरे होऊन घरी गेले आणि 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे.

Back to top button