पुणे : 233 ग्रामपंचायतींचे अंतिम प्रभाग जाहीर होणार | पुढारी

पुणे : 233 ग्रामपंचायतींचे अंतिम प्रभाग जाहीर होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील डिसेंबरमध्ये मुदत संपणर्‍या 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार प्रक्रिया सुरू असून, हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. येत्या 25 एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागातून देण्यात आली. जिल्ह्यातील मुदत संपणार्‍या 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

त्यानुसार प्रक्रिया सुरू असून, हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. येत्या 25 एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाकडून देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने 2023 मधील 233 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. अशा ग्रामपंचायतींची मुदत संपण्याच्या सहा महिने अगोदर प्रभागरचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

त्यानुसार प्रभागरचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी 13 तालुक्यातील 233 ग्रामपंचायतींची गुगल मॅपच्या साहाय्याने नकाशे अंतिम करण्यात आले आहेत. तत्पूर्वी नकाशे अंतिम करण्यासाठी तहसीलदार पातळीवर गटविकास अधिकारी, मंडल अधिकारी यांनी तपासणी करून तलाठी, ग्रामसेवक यांच्या संयुक्तिक पाहणीत प्रभाग पाडून सीमा निश्चित करण्यात आल्या. समितीच्या मान्यतेनंतर प्रारूप यादी जाहीर करून नागरिकांकडून सूचना हरकती मागवित सुनावण्या घेऊन दुरुस्त्या करत नव्याने प्रभागरचना यादीबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला.

डिसेंबरमध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती
आंबेगाव तालुका 30, बारामती 32, भोर- 27, दौंड 11, हवेली 4, इंदापूर 6, जुन्नर 26, खेड 25, मावळ 20, मुळशी 23, पुरंदर 15, शिरूर 8, वेल्हा 6 अशा एकूण 233 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Back to top button