काँक्रीटच्या जंगलात बहरली बाजरी; मोशी परिसर पीक फुलोर्‍यात | पुढारी

काँक्रीटच्या जंगलात बहरली बाजरी; मोशी परिसर पीक फुलोर्‍यात

मोशी; पुढारी वृत्तसेवा : मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहिलेल्या मोशी, डुडुळगाव, चर्‍होली पट्ट्यात शेतीक्षेत्र कमी होत चालले आहे. तरीही अशातही काही शेतकर्‍यांनी आजही आपला पारंपरिक शेती व्यवसाय जपला आहे. त्यांच्या परिश्रमामुळे काँक्रीटच्या जंगलातही बाजरी बहरलेली दिसत आहे.

यंदा चांगले पीक येण्याची आशा
शेतकर्‍यांना गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी बाजरीचे उत्पादन चांगले येण्याची अपेक्षा आहे. मात्र, अवकाळी पाऊस पडल्यास नुकसान होण्याची भीती डुडुळगाव परिसरातील धायरकरवाडी येथील शेतकरी प्रभाकर वहिले, आत्माराम वहिले, विकास धायरकर, नवनाथ वहिले, रोहिदास धायरकर हनुमंत धायरकर यांनी व्यक्त केली आहे.

बाजरी पिकासाठी कोणत्याही प्रकारचे तणनाशक व कीटकनाशकची फवारणी करण्याची गरज लागत नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी रासायनिक प्रक्रिया न होता बाजरीचे उत्पादन घेतात.

यंदाचे वर्षे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरे केले जात आहे. यामुळे बाजरीला मागणी वाढली आहे. कमी खर्चात आणि कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळवून देणारे बाजरीचे पीक असल्याने शेतकरीदेखील बाजरी उत्पादनाला प्राधान्य देत आहेत.
                                        – कुंदाकिनी वहिले, कृषीमित्र

Back to top button